top of page
                     औरंगाबाद तालुक्यातील ऐतिहासिक अशा दौलताबाद किल्ल्याच्या जवळच नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल अश्या निसर्गरम्य परिसरात  वसलेले  केसापुरीतांडा हे गाव. ग्रुप ग्रामपंचायत केसापुरी अंतर्गत असलेल्या या  गावातील संपूर्ण समाज हा बंजारा आहे. शेती हा मुख्य व्यवसाय. गावात  सन 1962 साली स्थापन झालेली जि. प. प्राथमिक शाळा  सन 2012 पर्यंत वर्ग 1 ली ते 4 थी पर्यंत होती. 4 थी पुढील वर्ग नसल्यामुळे चौथी पास झाल्यानंतर गावापासून 5 कि.मी. अंतरावरील माळीवाडा किंवा दौलताबाद या ठिकाणी पुढील वर्गासाठी जावे लागत होते.परंतु  शाळेला सन 2013 मध्ये " बाल शिक्षण हक्क कायदा 2009 " मुळे नविन 5 वी च्या वर्गाला मान्यता मिळाली आहे. व सन 2014 पासून शाळेत वर्ग 6 सुरु झाला आहे.....आमच्या शाळेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपले मनोगन व महत्वपूर्ण असे मार्गदर्शन आम्हाला कळवा आमच्या " आमच्यासाठी काही " या पेज वर ....  
आमची शाळा .....
bottom of page